
वाळूजमहानगर, (ता.4) :- दुचाकी चालवताना योग्य ती काळजी घेऊनच चालवली पाहिजे तसेच महाविद्यालय परिसरात संशयित वस्तू व व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. आणि आपल्या सहित परिसर कसा सुरक्षित राहील. याची दक्षता घ्यावी. असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.
पोलीस ठाणे एमआयडीसी वाळुज हद्दितील हायटेक इंजिनीअरींग महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीस विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक महिला व पुरुष अशा 300 ते 350 जणांनी सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांना दुचाकी चालवतांना नेहमी हेल्मेट वापरावे, दुचाकी चोरी होणार नाही. याकरिता व्हिल लॉक बसवुन घेण्यात यावे, दुचाकी चालवतांना हेडफोन कानाला लावुन चालवु नये, मोबाईल व इंटरनेचा वापर कशा प्रकारे करता येईल, इंटरनेटच्या माध्यमातुन होणारे गुन्हे, फसवणुक कशाप्रकारे टाळता येईल, जीवनात व्यायामाचे महत्व व त्यामुळे होणारे फायदे. याबाबत माहिती देवुन महाविद्यालयात अथवा परिसरात एखादी अप्रिय घटना घडत असल्यास किंवा संशईत इसम अथवा वस्तू दिसून आल्यास तात्काळ आपल्या पालकांना, प्राध्यापकांना अथवा पोलिसांना कळवावे. अशा सूचना देण्यात आल्या. तसेच महाविद्यालयात येणाऱ्या तरुणींच्या सोबत असलेले महिला पोलीस उप निरीक्षक स्वाती उचीत यांचे मार्फतीने सुरक्षे विषयी समस्या समजावुन घेवुन त्यांना योग्य मार्दर्शन करण्यात आले.
