
वाळुज महानगर, (ता. 6) – भरधाव जाणारी कार आणि दुचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकीवरील एक जण जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (ता.6) रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जीकठाण फाट्यावर झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कार (एम एच 20, डीव्ही -4018) व दुचाकी (एमएच 29, सीएच -6614) ही दोन्हीही वाहने मंगळवारी (ता. 6) रोजी गंगापूरकडून छत्रपती संभाजीनगर कडे येत होती. वाळुज जवळील जिकठाण फाटाजवळ येताच कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात यवतमाळ येथील 28 वर्षीय तरुण जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच सागर शेजवळ यांनी प्रवाशांच्या मदतीने जखमीला श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहीकेतून उपचारार्थ घाटीत दाखल केले. दरम्यान अपघातग्रस्त कार मध्ये 3 प्रवासी होते. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
