March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.26) – कार घेण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे आण अशी मागणी करत एका 27 वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी तिघांविरूध्द वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनम रा.वडगाव कोल्हाटी हिचा 2 मे 2023 रोजी अक्षय राऊत रा. रामकृष्ण रेसिडन्सी चिखली ता.जि.पुणे याच्या सोबत विवाह झाला होता. त्यावेळी सोनमच्या कुटुंबियांनी सोन्याचे दागिने, रोख 15 लाख रुपये व घरगुती वस्तू लग्नात दिल्या होत्या. सोनम पुणे येथे एका कंपनीत काम करते़ दरम्यान, लग्न झाल्यानंतर सासरी तिला काही महिने चांगले वागवले. मात्र त्यानंतर सासु, सासरे व पती यांनी माहेराहून कार व घर घेण्यासाठी पैसे घेऊन ये तसेच पगारातील पैसे द्यावेत अशी मागणी करत तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यावेळी सोनमने लग्नात खर्च केल्याने तिच्याकडे पैसे नसल्याचे सांगत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचे काही न एकता पती, सासु, सासरे यांनी शिवीगाळ, मारहाण करत जेवण न देणे, घरातून हकलून देणे असे प्रकार सुरू केले. अक्षयला दारूचे व मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन असल्याने तो त्रास देत तिच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. या त्रासाबद्दल सोनमने आई, वडीलांना माहिती दिली. त्यांनी अक्षय व त्याच्या कुटूंबियांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा अपमान करत घरातून हकलून दिले. याबाबत भरोसा सेल येथे तक्रार केली असता, तेथे सोनमला सासरी घेवून जाऊ व चांगली वागणूक देऊ असे सांगितले. मात्र अद्यापही तिला घेऊन गेले नाही. याप्रकरणी पती अक्षय राऊत, सासरे बळीराम राऊत, सासु पुष्पा राऊत यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. पुढील तपास पोउपनि स्वाती उचित करत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *