March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.30)- कंपनीत टॅपिंग ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराने कंपनीतील 75 हजार रुपये किमतीचे टॅब लंपास केल्याचे सोमवारी (ता.29) रोजी उघडकीस आले. वाळुज येथील इटावा गट नंबर 13 मधील कंपनीत ही चोरी झाली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज परिसरातील इटावा गट नंबर 13 मधील बोलजन अँड मदर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे स्टोअर इंचार्ज योगेश बोरूडे, कंपनी मालक बाबासाहेब पंडीतराव औटे आणि हिमांशू विठ्ठल येलदी व इतर कामगार यांनी बोलजन अँड मदर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपणीत वापरत असलेल्या टॅबची सोमवारी (ता.29) रोजी तपासणी केली. त्यामध्ये 75 हजार रुपये किमतीचे लोखंडी धातूचे 75 टॅब, प्रत्येकी 1 हजार रुपये किमतीचे 75 टॅब चोरीस गेल्याचे आढळून आले आहे. ही चोरी कंपणी मधिल टॅपिंग ऑपरेटर वशिम तस्कीर अहमद वय 38 वर्ष रा. संग्रामपूर जिल्हा बदायू तहसिल पिसोली बिलॉग आसमपुर याने एक एप्रिल ते दिनांक 28 एप्रिल दरम्यान कंपनी व्यवस्थापकांची नजर चुकवून केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनी व्यवस्थापक हिमांशू येलदी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी वसीम तस्कर अहमद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *