March 24, 2026

वाळूज महानगर, (ता.23) – ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील कामगार गंभीर जखमी होऊन ठार झाला. शनिवारी (ता.20) रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास रांजणगाव (शेणपुंजी) येथील बालकृष्ण पेट्रोलपंप, एकतानगर चौकाजवळ झालेल्या या अपघाता प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विलास तात्याभाऊ गायकवाड, (46) रा. देवगीरी कॉलनी, रांजणगांव (शेणपुंजी) हा वाळूज औद्योगिक वसाहतीतील जी. आर. इंजीनेअरींग, या कंपनीत काम करत होता. तो शनिवारी सकाळी कामावर जात असताना कंटेनर चालक जावेद उर्फ गुफरान उस्मान खान, वय- 27, रा. शेरपुर, ता. जि. बिदशा, (मध्यप्रदेश) याने त्याच्या ताब्यातील कंटनेर (एम पी 09, एच जी -5751) हा भरधाव, निष्काळजीपणे व हयगईने चालवून विलास गायकवाड याच्या दुचाकी (एम एच 20, जी डी -3180) ला ओव्हटेक करतांना धडक दिली. शनिवारी (ता.20) रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास रांजणगाव (शेणपुंजी) येथील बालकृष्ण पेट्रोलपंप, एकतानगर चौकाजवळ अपघातात विलास गायकवाड हा गंभीर जखमी होऊन ठार झाला. या प्रकरणी कैलास तात्याभाऊ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी कंटेनर चालक जावेद उर्फ गुफरान उस्मान खान याच्या विरुद्ध कलम 304 (अ), 337, 338, 279 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. आधाने करत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *