March 26, 2026

वाळूजमहानगर, (ता.11) – सिडको वाळूज महानगर प्रकल्प अंतर्गत दैनंदिन औषध व धुर फवारणी होत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत सिडको वाळुज महानगर बचाव कृती समितीच्या वतीने सिडको प्रशासनास निवेदन देवून तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सिडको वाळुज महानगर येथे धुर व औषध फवारणी संदर्भात काढण्यात आलेल्या टेंडर मधील अटी शर्तीचे पालन होत नाही. त्यामुळे परिसरात मोठ्या संख्येत डास निर्माण झाले असून त्वचा रोगासारख्या विविध आजाराचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या बाबत व्हाटस अॅप ग्रुपवर, मोबाईल फोनवर, वैयक्तिक भेटुन तसेच निवेदनाच्या माध्यमातून सतत तक्रारी प्राप्त होत आहेत.
त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर योग्य ती दंडात्मक कार्यवाही करून पुढील काळात दैनंदिन औषध व धुर फवारणी वेळापत्रकाप्रमाणे करावी. तसेच परिसरात मोकाट कुत्रे तसेच डुकराच्या प्रमाणात वाढ झाली असुन बर्‍याच नागरिक यांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहेत. त्यामुळे या मोकाट डुकरांचाही तात्काळ बंदोबस्त करावा.
अशी मागणी सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष यथा तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, विनोद साठे, विक्रम तिडके, जनार्दन चिल्लारे, नरेंद्रसिंग यादव, दत्तात्रेय वर्पे यांनी केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *