March 23, 2026


वाळूज महानगर (ता.24) :- दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला चक्कर आल्याने ती दुचाकी वरून पडून जखमी झाली. हा अपघात गुरुवारी (ता.23) रोजी दुपारी 4:41 वाजेच्या सुमारास जिकठाण फाट्याजवळील जय मल्हार हॉटेल समोर अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंबुलन्सने जखमी महिलेला उपचारार्थ दाखल केले.

नशिम खलील शेख ही महिला गुरुवारी (ता.23) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास औरंगाबादकडून ईसारवाडी फाटा मार्गावरून ढाकेफळ येथे जात होती. जिकठाण फाट्याजवळील जय मल्हार हॉटेल समोर तिला चक्कर आल्याने ती चालू गाडीवरून खाली पडली. अपघाताची माहिती मिळताच जवळच असलेल्या नानिज धाम रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी या जखमी महिलेला लोकांच्या साह्याने अंबुलन्स मध्ये शिफ्ट करून गंगापूर येथील ग्रामीण जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *