वाळूजमहानगर – औरंगाबाद सिटी कराटे डो असोसिएशन व औरंगाबाद जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सबज्युनिअर अजिंक्यपद कराटे स्पर्धेत औरंगाबाद शहर व जिल्ह्यातून खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धा या सबजुनिअर, मुले व मुली, अश्या कुमिते व काता अश्या प्रकारात विविध वजन गट व वयोगटात झाल्या. या स्पर्धेतुन औरंगाबाद येथे 5 ते 6 नोव्हेंबर 2022 दरम्यान राज्यस्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धेसाठी औरंगाबाद शहर व औरंगाबाद जिल्हा असे संघ निवडण्यात आले आहे
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, इंद्रप्रीत कौर, अर्चना पवार, आर. सिद्धीकी, रमेश अवचार, ऍड- योगेश ढोबळे तसेच शहर संघटनेचे अध्यक्ष अरुण भोसले, सचिव मुकेश बनकर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव, उपाध्यक्ष विजय टकले, सचिव बळीराम राठोड आदींची उपस्थिती होती.
स्पर्धा यशस्वीतेसाठी अजीम शेख, गणेश वास्कर, संदीप साखरे, सचिन काळे, निलेश घोंगडे, अक्षय सोनवणे, कुणाल पाटील, नितीन चव्हाण, सचिन तिवारी, शंतनू दाणी, क्रांतिश्वर बकर, शुभम बेलोकार, अशोक सातदिवे, वैभव सावंत, निलेश माने, दीपक वाघमारे, आर्यन जैतमल, शीतल जाधव, स्वरांजली येलपल्ले, अजय राऊत, अर्जुन भालेकर यांनी परिश्रम घेतले.