March 24, 2026

वाळूज महानगर, (ता.22) – बी. जी. पी. एस. संचलित एपीएस स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन बुधवारी (ता.21) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योग म्हणजे आरोग्य, योग म्हणजे शांती, योग म्हणजे संस्कृती. आणि या संस्कृतीचे पालन करण्याचा दिवस म्हणजे योग दिन.

 

21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनी संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. योग दिनाचे महत्त्व सर्वांना यावेळी पटवून देण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव अमन जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्ष तसेच मार्गदर्शिका म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला शर्मा यांनी काम पाहिले. यावेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांबरोबर पालक आवर्जून उपस्थित राहिले व योगीक क्रिया केल्या. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगीक क्रिया करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिकेने सर्वांना योग जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे हे सांगितले. योगामुळे मानसिक संतुलन तसेच शारीरिक स्वास्थ्य राखले जाते. सर्वांनी योग आपल्या जीवनात सामील करावा व आपले आरोग्य राखावे. असे सुचविले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *