March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.1) – श्री गजानन विद्या मंदिर व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी वैष्णवी बेद्रे आणि निखिल खंदारे यांचा पहिल्याच यादीत शासकीय कोट्यातून एमबीबीएससाठी नंबर लागला. या गुणवंत विद्यार्थी व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. याप्रसंगी रामेश्वर गाडे यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी सुरक्षा संबंधी विविध उपयोजना बद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वैष्णवी बेद्रे हिचा जे. जे हॉस्पिटल आणि निखिल खंदारे याचा ईएसआय हैदराबाद यांचा शासकीय कोट्यामधून एमबीबीएससाठी नंबर लागल्याबद्दल शाळेतील त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आय.जी. जाधव, संस्थेचे सचिव हरीश जाधव, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुरेखा बसवदे, माध्यमिकचे मुख्याध्यापक हनुमान जाधव, प्राथमिक विभाग प्रमुख मनीषा नवथर, इंग्रजी माध्यम विभाग प्रमुख रेखा बिदरकर, भाऊसाहेब शिरसाट आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब मोहिते तर आभार हनुमंत जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहाजी मंगनाळे, गुलाब मोहिते, अशोक तारडे, उल्हास वाघ, कल्याण कुलकर्णी, विशाल जाधव, संदीप हिंगणकर, स्वाती सूर्यवंशी, दिपक पठारे, पूजा गिरी, परमेश्वर गीते, शरद जाधव, उज्वला सवाई, गंगासागर बोराडे, संजीवनी चीकाळे, अनुराधा मुळे, स्वाती पाटील, सानिया पठाण, क्रांती पवार, विशाल जाधव, अंकिता सिंह, सुनील शिंदे, प्रल्हाद मंगनाळे, विनय अवसरमोल आदीनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *