March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.13) -वाळूज परिसरातील एकोणावीस वर्षीय विवाहित महिला घरातील कोणास काहीही न सांगता बेपत्ता झाली. 8 एप्रिल पासून बेपत्ता असलेल्या या महिलेचा शोधासाठी तिच्या पतीने पोलिसात धाव घेतल्याने ती हरवल्याची नोंद शुक्रवारी (ता.12) रोजी करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रेणुका संतोष गुंजाळ (वय 19) रा. भुजंगवस्ती, भगतसिंग शाळेजवळ कमळापुर रोड ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर ही विवाहित महिला कोणास काहीएक न सांगता राहत्या घरातुन 8 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास निघुन गेली. ती अद्यापही घरी परत आली नाही. म्हणुन तिचा परिसरात, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक व नातेवाईक आदी ठिकाणी तसेच तिच्या माहेरी जावुन शोध घेतला. परंतु ती मिळुन आली नाही. या प्रकरणी संतोष रामदास गुंजाळ यांच्या खबरीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रेणुका गुंजाळ ही विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या विवाहितेचा शोध पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रेखा चांदे घेत आहे.

       हरवलेल्या विवाहितचे वर्णन असे-

नाव रेणुका संतोष गुंजाळ, वय 19 वर्ष, व्यवसाय- गृहीणी, रा. भुजंग वस्ती भगतसिंग शाळेजवळ कमळापुर रोड ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर, वर्ण- सावळा, उंची 5 फुट, चेहरा- गोल, केस काळे लांब, नाक- सरळ, भाषा- मराठी, वडारी बोलते, पोषाख-हिरव्या रंगाची साडी, पायात चप्पल.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *