वाळूजमहानगर, ता.27 (बातमीदार) – बजाजनगर येथील धनलक्ष्मी आटोमोबाईलचे संचालक तथा व्यापारी मित्र मंडळाचे सदस्य प्रसिद्ध युवा उद्योजक संतोष चंद्रकांत ढमढेरे (48) यांचे बुधवारी (ता 27) रोजी सकाळी 5 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 2 वाजता मोहटादेवी चौकातील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे व्यापारी वर्गाने दुपारपर्यंत मीनाताई ठाकरे मार्केट व महाराणा प्रताप चौकातील प्रतिष्ठाने बंद ठेवून दुखवटा व्यक्त केला.