March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.6) – “परोपकार हा परमधर्म आहे” या अध्यात्मिक संदेशाला आत्मसात करत वाळूज औद्योगिक वसाहतीतील ईप्का लॅबोरेटरीज लिमिटेड या कंपनीमध्ये बुधवारी 5 नोव्हेंबर 22 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात कंपनीतील 38 कामगार आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी आणि मानवतेचे ऋण व्यक्त केले. या शिबिरातून जमा झालेले रक्त सत्य साई ब्लड बँक, छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून थॅलेसिमिया रुग्ण तसेच गरजू रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे.


“परोपकारे पुण्य म्हणावे, पाप म्हणावे ते परपीडे” या वचनाचा अर्थ कर्मात उतरवत, कर्मचाऱ्यांनी रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदानाचे पुण्यकर्म केले. रक्तदान म्हणजे केवळ काही थेंब रक्त देणे नव्हे, तर एखाद्याला नवजीवन देण्याचा पवित्र प्रयत्न आहे. असे या प्रसंगी बोलताना कंपनीचे उप-महाव्यवस्थापक व्यंकट मैलापूरे यांनी सांगितले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी एकनाथ पवार, प्रफुल कांबळे, अनिकेत सूर्यवंशी, संतोष कोटकर आदींनी मोलाचे सहकार्य केले.

कंपनीचे विभागीय अधिकारी (साईट हेड) संजय चौबे यांनी सर्व रक्तदात्यांचे कौतुक करून त्यांना “मानवतेचे खरे पूजक” असे संबोधक चिन्ह देऊन स्वागत केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *