March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.29) – भरधाव जाणारी दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात 35 वर्षीय इसम गंभीर जखमी झाला. इसारवाडी फाटा ते शेंदूरवादा रोडवरील मुरमीजवळ शुक्रवारी (ता.29) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातातील जखमीवर घाटीत उपचार सुरू आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिडकिनवरून इसारवाडी फाटाकडे येत असताना दुचाकीस्वार समाधान (पूर्ण नाव कळू शकले) वय 35, हा दुचाकीवरून येत होता. त्याची दुचाकी
छत्रपती संभाजीनगर पुणे हायवेवरील इसारवाडी फाटा येथे मुरमीजवळ शुक्रवारी (ता.29) रोजी सकाळी 11: 20 वाजेच्या सुमारास स्लीप होऊन तो गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती लिंबे जळगांवचे सरपंच यांच्याकडून मिळताच लिंबे जळगाव पॉईंटवर उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थांची 24 तास सेवेत असणारी विनामूल्य ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी तात्काळ अपघात ग्रस्त ठिकाणी हजर होऊन अपघातग्रस्ताला जिल्हा रुग्णालय घाटी येथे दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *