February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.27) – शिवराई आश्रम शाळा, वाळूज येथे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणभाऊ पाठे (नाना) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन गुरुवारी (ता.26) रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


प्रथम सकाळी विद्यार्थीची सवाद्य प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर शालेय ध्वजारोहण लक्ष्मणभाऊ पाठे (नाना) यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालचंद भुजंग, बापुसिंग पाटील, अमृता फर्माचे शिंदे व बहुसंख्य पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम झाला.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा. त्या द्रुष्टीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी 21 प्रकारचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सोबतच माझी सुंदर शाळा व त्यांना सर्व माहित आहे. या दोन नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या. कार्यक्रमासाठी परीसरातील पालकांची उपस्थिती होती. शेवटी झुमका वाली या गाण्याने कार्यक्रमाचा शेवट झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भगवान पाटील, सुत्रसंचलनात शालेय शिक्षक ज्ञानेश्वर मोकळे, शिंपी गितांजली, शर्मिला देसले, योगिता पाटील, राहुल गोमलाडु, दीपक नागरे, आनंद डुकरे, अकीला पटेल यांनी केले. तर वस्तीगृह अधिक्षक करतार पवार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवकाबाई आरगडे, भानुदास कापडे, क्षरी गोरे, भारती मोरे यांनी परीश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *