March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.8) – जागतिक महिला दिनानिमित्त आशा वर्कर्ससाठी कर्करोग जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात बुधवारी पंढरपूर येथील एका हॉस्पिटल येथे करण्यात आली.

महिलांच्या योगदानाचा सन्मान दररोज व्हावा. याच विचाराने रक्षा छत्रपती संभाजीनगर चॅप्टरने हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. यात डॉ. वृषाली देशपांडे आणि डॉ. अनघा दिवाण यांनी गर्भाशय, मुख आणि स्तनाच्या कर्करोगावर आशा वर्कर्सना मार्गदर्शन करून महिलांच्या प्रश्नांचे निरसन केले. यावेळी महिलांसाठी मोफत स्त्री रोग तपासणी शिबीर, अल्ट्रासाऊंड शिबीर प्रत्येक वर्षी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ. शिल्पा सातारकर, डॉ. मीता चिटणीस, डॉ. शुभांगी शेटकर, डॉ. प्रीती जाधव, डॉ. लोणीकर, डॉ. सोनाली साबू, डॉ. प्रीती खटावकर यांच्यासह आशा वर्करची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. सुशांत भदाणे, डॉ. प्रशांत पाटील आदीनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *