February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.27) – कोणतीही पूर्व सूचना न देता लॉकडाऊनमध्ये कामावरुन कमी केलेल्या आयसीम कॉलेजच्या सफाई कर्मचार्यांने विविध मागण्यासाठी वाळुज येथील आयसिम महाविद्यालयासमोर मंगळवारी (ता. 20) पासून कुटुंबासह साखळी उपोषण सुरु केले आहे.

वाळूज परिसरातील आयसीम महाविद्यालयात 2011 पासून भाऊसाहेब नागोजी शेजुळ (रा.वाळूज) हा सफाई कर्मचारी म्हणून काम करीत होता. लॉकडाऊन लागल्यानंतर भाऊसाहेब शेजुळ याला कामावरुन कमी करण्यात आले. दरम्यान, लॉकडाऊन उघडल्यानंतर भाऊसाहेब शेजुळ याने कामावर परत घ्या. यासाठी महाविद्यालयाकडे सतत पाठपुरावा केला. मात्र व्यवस्थापनाकडून तुमचे वय झाले असून तुम्ही कामावर येऊ नका. असे सांगुन कामावर घेण्यास नकार दिला. कामावर परत घ्यावे, यासाठी भाऊसाहेब शेजुळे याने कामगार उपायुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, आयसीम महाविद्यालय यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला. तरीही कामावर परत घेतले जात नसल्याने तसेच भविष्य निर्वाह निधी, पगारी सुट्याचा पगार, ग्रॅच्युएटी आदी कायदेशिर देणी व्यवस्थापनकडून दिली जात नसल्याने भाऊसाहेब शेजुळ याने पत्नी कस्तुराबाई, मुलगा विजय व सुन सिमा शेजुळ यांच्यासह मंगळवारी (ता. 20) पासून महाविद्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला भाकपचे तालुका सहसचिव कॉ.रतन अंबीलवादे, शाखा सचिव ईब्राहिम पटेल, कॉ.विठ्ठल त्रिभुवन यांनी पाठींबा दिला आहे. दरम्यान बी पँथरचे जिल्हा अध्यक्ष अशोक श्रीखंडे यांनीही या उपोषणास पाठिंबा जाहीर केला आहे.

उपोषणार्थीशी कॉलेजचा संबध नाही – व्यवस्थापन

या उपोषणाबाबत आयसीम कॉलेजच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भाऊसाहेब शेजुळ हा कंत्राटी कामगार होता. संबंधित ठेकेदाराने त्याला काढले आहे. त्याचा महाविद्यालयाशी काहीही संबध नाही. त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याने ठेकेदार व न्यायालयात दाद मागावी. त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *