February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.19) – ग्रामपंचायत कार्यालय पाटोदा – गंगापूर ने.येथे आमदार तथा विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या स्थानिक आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचा उद्घाटन गुरुवारी (ता.15) रोजी अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्या स्थानिक विकास निधीतून 40 लक्ष रुपये जि.प.प्रा.शाळा इमारत बांधकामाचे भुमीपूजनही अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दानवे यांनी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी दोन खोल्या देण्यास जाहीर केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपतालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य गणेश नवले, महिला आघाडी संघटक प्रतिभा जगताप,

बजाजनगर – वडगाव (को.) चे माजी सरपंच सचिन गरड, मच्छिंद्र झळके, विष्णू जाधव, महिंद्रा, खोतकर, जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल दादा पेरे, सुनील मातकर, पाटोदा चे शिल्पकार भास्करराव पेरे, माजी सरपंच कल्याणराव पेरे, वि.वि.का.सो.चेअरमन चंद्रकांत पेरे, शिवाजी जाधव, ग्राम विकास अधिकारी पी.एस.पाटील, सरपंच जयश्री दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे, ग्रामपंचायत सदस्य पूनम गाडेकर, बेबीबाई पेरे, मंदा खोकड, मीरा जाधव, शामल थटवले, लक्ष्मण मातकर, पुष्पा पेरे, सुनिता पेरे, छाया पवार यांच्यासह गांवकरी मंडळी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *