March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.14 – वाळूज येथील शिवाजीनगर परिसरात नव्याने सुरू झालेल्या डॉ. जाधव यांच्या सुश्रुत जनरल हॉस्पिटल व सुश्रुत आयुर्वेद चिकित्सालय येथे हे सुवर्णप्राशन उपलब्ध आहे. पहिले सुवर्णप्राशन बुधवारी (ता.15) रोजी मोफत देण्यात येणार आहे. हे सुवर्ण प्राशन बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.

सुवर्ण प्राशन म्हणजे काय –
सुवर्णप्राशन ही एक आयुर्वेद चिकित्सा पद्धती
असून यामध्ये बालकाची रोगप्रतिकार क्षमता, बुद्धी, स्मृती, एकाग्रता, वर्ण, पचन व आयुष्य वर्धनासाठी सुवर्णभस्म व इतर औषधी वनस्पती पासून तयार केलेले औषधे तोंडाद्वारे दिले जाते.

        सुवर्णप्राशनाचे फायदे –
बालकाची रोग प्रतिकार शक्ती वाढते व बालक वारंवार आजारी पडणे कमी होते. बालकाची स्मृती, एकाग्रता, ग्रहणशक्ती, मेधा, वाढण्यास मदत होते. स्वास्थरक्षण होते, मतीमंदता, बालकाच्या सर्वांगीण विकास, स्वव्यग्रता यामध्ये उपयुक्त.

        सुवर्णप्राशन कधी द्यावे –
जन्मापासून ते 16 वर्षापर्यतच्या वयोगटातील सर्व बालकांना सुवर्ण प्राशन द्यावे. दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर बाळाला सुवर्णप्राशन द्यावे.

          पहिले सुवर्णप्राशन मोफत –
वाळुज येथे कमळापुर रोडवरील गोदावरी पब्लिक स्कुलजवळ, नव्याने सुरू झालेल्या सुश्रुत जनरल हॉस्पिटल व सुश्रुत आयुर्वेद चिकित्सालय या ठिकाणी पहिले सुवर्ण प्राशन बुधवारी 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मोफत सर्वांना मोफत देण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन बालरोग तज्ञ डॉ. आशिष कृष्णा जाधव व स्त्रीरोग व पंचकर्म तज्ञ डॉ. श्रुती आशिष जाधव यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *