वाळूजमहानगर – मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी व दोन ठिकाणी असलेली नावे एकाच ठिकाणी असावे. म्हणून आधार कार्ड मतदान कार्डाशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते करून घ्यावे. असे आवाहन तिसगाव ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत तिसगाव अंतर्गत सिडको वाळूज महानगर 1 व 2 अंतर्गत, सिध्दिविनायक विहार, म्हाडा काॅलनी, ए एस क्लब, साऊथसिटी, फुलोरा, वास्तुवैभव अपार्टमेंट, विराज हाईट, मंजित प्राईड, सारा ईलाईट, गणेश नगर, सतिश विहार, नंदनकानन, चौधरी भुवी, साक्षी नगरी या व जवळपासच्या तिसगाव परिसरातील सर्वच मतदारांना आवाहन करण्यात येते की, आधार कार्ड मतदान कार्डाशी लिंक करून घेण्यासाठी 16 व 18 सप्टेंबर रोजी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मतदान करण्यासाठी आधारकार्ड लिंक करणे आवश्यक आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये. म्हणून सर्व मतदारांनी सिडको वाळूजमहानगर-1 मधील माता रमाबाई आंबेडकर काँलेज तसेच जि.प.शाळा तिसगाव येथे येऊन आपले आधार कार्ड मतदान कार्डशी लिंक करून घ्यावे, येताना सोबत आधारकार्ड व मतदान कार्ड आणावे. असे आवाहन ग्रामपंचायत तिसगावच्या सरपंच शकुंतला कसूरे, उपसरपंच नागेश कुठारे व ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड यांनी केले आहे.
