March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.5)- महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ रांजणगाव (शेणपुंजी) येथे उद्या सोमवारी (ता.6) रोजी सायंकाळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेनिमित्त गंगापूर- खुलताबाद विधानसभा मतदार संघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट व काँग्रेसचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत कमळापूर येथील महादेव मंदिर परिसरात नियोजन बैठक रविवारी (ता.5) रोजी सायंकाळी घेण्यात आली.

याप्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस उपजिल्हाप्रमुख लक्ष्मणभाऊ सांगळे, कृष्णा पाटील डोणगावकर, तालूकाप्रमुख दिनेश मुथा, राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगापूर -खुलताबाद तालूकाध्यक्ष ज्ञानेश्वर निळ, जिल्हा परिषदेचे वाळुज येथील माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, गंगापूर पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, घाणेगावचे माजी पंचायत समिती सदस्य संतोष गायकवाड, माजी उपसभापती संपत छाजेड, उद्योजक अमोल लोहकरे, जोगेश्वरीचे माजी सरपंच प्रवीण दुबिले, युवा सेना उपतालुका अधिकारी रमेश आरगडे, जोगेश्वरी ग्रामपंचायत सदस्य मन्साराम बिलवाल, उपतालुकाप्रमुख मनोज पिंपळे, रांजणगाव येथील विभाग प्रमुख कैलास हिवाळे, वाळुज विभागप्रमुख बाळासाहेब चनघटे, शहर प्रमुख बाबासाहेब आरगडे, विश्वनाथ थोरात, देवेंद्र चव्हाण, तुर्काबाद येथील बाळासाहेब शेळके यांच्यासह वाळुज, रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव, कमळापूर, लिंबे जळगाव, लांझी, पिंपरखेडा, तुर्काबाद, येसगाव, दिघी, अंबेलोहोळ, लासुर स्टेशन, पोळ रांजणगाव, शिल्लेगाव येथील महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *