वाळूजमहानगर, ता.21 – महाराष्ट्र मराठी पूर्व प्राथमिक, प्राथमिक, हायस्कूल, वाळूज ता. गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे संस्थापक अध्यक्ष नबी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली “अल्पसंख्यांक हक्क दिवस” 18 डिसेंबर 2024 बुधवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक तथा सहारा एज्युकेशन वैद्यकीय सेवा मंडळ औरंगाबादचे प्रशासकीय अधिकारी
अफसर पटेल यांची उपस्थिती होती. प्रथम व्यवहारांच्या हस्ते मौलाना अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक हक्काविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी अल्पसंख्यांक हक्क दिवस या विषयावर पोस्टर तयार भाषणे केले. त्यानंतर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे सहशिक्षक रविंद्र उकिर्डे, इरफान शेख, रफिक शेख, अय्युब सय्यद, योगेश मोर्ये, रघुनाथ अंभुरे, संतोष खरात, रविंद्र फरकाडे, अरविंद गोरे, स्वप्निल काकडे, ताजुद्दीन शेख, गोपाल जिरे, गणेश बनकर, किसन बारवाल यांची यावेळी उपस्थिती होती.
