
वाळुज महानगर, (ता.9) – शाळेत शिकणार्या एका अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी घेवुन जावुन एका विधी संघर्ष बालकासह 6 जणांनी तिचे नग्न अवस्थेत व्हीडीओ व फोटो काढले. व ते व्हायरल करण्याची धमकी देवुन तिच्यासोबत वारंवार शारिरिक संबंध केले. ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2023 पर्यंत सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही अत्यंत लाजिरवाणी घटना गुरुवारी (ता.8) रोजी रात्री उघडकीस आली. दरम्यान पोलिसांनी सहा जणांपैकी चौघांना ताब्यात घेतले आहे. 
याबाबत सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिलेली माहिती अशी की, प्रकरणातील सहा आरोपींनी अंदाजे ऑक्टोबर 2022 पासुन ते एप्रिल 2023 पर्यंत सातारा परिसरातील एका शाळेत शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षे 10 महिन्याच्या अल्पवयीन मुलीस वेगवेगळ्या ठिकाणी घेवुन जावुन तिचे नग्न अवस्थेत व्हीडीओ व फोटो काढले. व ते व्हायरल करण्याची धमकी देवुन तिच्यासोबत वारंवार शारिरिक संबंध केले. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून मपोउपनि वंदना मुळे यांनी पीडित मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवून व डी.ओ अधिकारी पोउपनि गोरे यांनी आरोपी अक्षय चव्हाण रा.लालमाती, देवळाई परिसर छञपती संभाजीनगर, एक विधी संघर्षग्रस्त बालक रा.सदर, असीम पठाण (एच.पी.) रा. देवळाई परिसर छञपती संभाजीनगर, असीम पठाण याचा एक अनोळखी मित्र, राम गायकवाड रा.आलोकनगर सातारा परिसर छञपती संभाजीनगर व राम गायकवाड याचा एक अनोळखी मित्र यांच्या विरुद्ध कलम 376 (डीए), 376 (3), 376 (2) (जे), 376 (2) (एन), 376 (2), 363, 366 (ए) भादंवि सह कलम 4, 5 (एल), 6, 8, 9 (एल), 10, 11, 12, 16 पोक्सोसह कलम 66 (ई), 67(बी) आय टी कायद्यानुसार सातारा पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.8) जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दरम्यान सातारा पोलीसांनी सहा आरोपींपैकी चौघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार स्वतः करीत आहे.
