March 23, 2026


वाळूजमहानगर, ता.15) – हिंदू, शेख, बौद्ध समाजाच्या तीर्थस्थळांना भेट व दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करावी. ही मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील भाविकासह उत्तर भारतीय उद्योजक, कामगार यांची सुविधा होणार आहे.
भगवान श्री रामाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून अयोध्या प्रयन्त वंदे भारत ट्रेन चालवावी. संपर्क क्रांती (12753) ही ट्रेन आठवड्यातून एकदा धावते, ती दररोज सुरू करा आणि दीक्षाभूमी एक्सप्रेस कोरोनाच्या काळात बंद झाली आहे, ती सुरू करा. अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे रेल्वेमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे उद्योजक नरेंद्रसिंह यादव यांच्या वतीने करण्यात आली होती. या निवेदनात असे म्हटले की, विविध धार्मिक स्थळांसह उद्योजक, कामगार यांना उत्तर भारतात थेट रेल्वे सेवा नसल्याने मराठवाड्यातील जनतेला छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पासून 180 किमी अंतरावर असलेल्या मनमाड किंवा भुसावळला जावे लागते. ते अत्यंत गैरसोईचे असल्यामुळे येथील जनता रेल्वे सुविधेपासून वंचित आहे. मराठवाड्यासह जिल्ह्यातील लाखो रामभक्तांना भगवान श्री रामाच्या दर्शनाचा लाभ घेता यावा. यासाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून अयोध्या प्रयन्त वंदे भारत ट्रेन चालवावी. ही रेल्वे सेवा सुरू झाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर तर होणार आहेच, शिवाय याचा फायदा पंतप्रधान तीर्थस्थान योजनेला मिळणार असून काशी विश्वनाथ, प्रयागराज, अयोध्या, गोरखधाम, गयाधाम येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना दर्शनाचा लाभ मिळणार आहे. राम भक्तांबरोबरच शीख व बौद्ध समाजाच्या धार्मिक स्थळांना भेट व दर्शनासाठी मराठवाड्यातून रेल्वे सुरू केल्यास
रेल्वेचेही उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या मागणीची दखल घेऊन रेल्वेने औरंगाबाद ते आयोध्या ही वंदे भारत रेल्वे सुरू केली आहे. तसे लेखी पत्र नांदेड रेल्वे मंडळ, विभागिय व्यवस्थापक कुमार मीना यांनी उद्योजक नरेंद्र सिंह यादव यांना दिले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *