
वाळूज महानगर, (ता.30) – आमली पदार्थाचे सेवन करणार्या
रांजणगाव येथील दोघांवर एमआयडीसी वाळूज पोलीसांनी कारवाई केली. समाधान विठ्ठल बडे (20) रा. पवननगर रांजणगाव (शेपु), आकाश प्रकाश सावळे (20) रा.शिक्षक कॉलनी रांजणगाव (शेपु) असे कारवाई केलेल्या तरुणाचे नावे आहे़.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोउपनि दिपक रोठे, पोना. सुरज अग्रवालसह कर्मचारी
शनिवारी (ता.28) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असतांना रांजणगाव येथील क्लिप्टन वाईन शॉपच्या बाजूला दोन जण आमली पदार्थाचे सेवन करतांना दिसले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात समाधान बडे, आकाश सावळे या दोघा विरूध्द एनडीपीएस कायदा नुसार कारवाई करण्यात आली.
