February 4, 2026

वाळूजमहानगर, (ता 28) – रस्ता ओलांडणाऱ्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघींचा चिरडून मृत्यू झाला. हा अपघात वाळूज परिसरातील धुळे सोलापूर रोडवरील तनवाणी कॉलेज समोर बुधवारी 28 जानेवारी रोजी सायंकाळी झाला.

या अपघाता बाबत मिळालेली माहिती अशी की, अनुसया चव्हाण (वय 42) व वंदना चव्हाण (वय 32) या दोघी बुधवारी 28 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातून जाणारा सोलापूर धुळे हायवे ओलांडत होत्या. त्याच वेळी त्यांना एका अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन चिरडले. या अपघातात दोघीही गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या अपघाताची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *