लिंबे जळगाव – नवरात्र उत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंबेलोहळ येथील श्री रेणुका माता मंदिरात भागवत कथाकार ह भ प मनिषाताई बिडाईत यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी देवीचे महत्व समजावून सांगितले.
श्री रेणुका मातेमुळे प्रसिद्ध झालेल्या अंबेलोहळ येथे नवरात्र महोत्सव निमीत्त हभप भागवताचार्य मनिषाताई महाराज बिडाईत यांचे सुश्राव्य हरीकीर्तन सेवा शुक्रवारी झाली. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर ‘धाव घाली आई। आता पाहतीस काई’ या चिंतन मांडताना,,, खरी आदिशक्ती मंदिरात नसून ती प्रत्येकाच्या घराघरात, आई, बहिणी, पत्नी, लेकी, सुना, नातीच्या रुपात आहे. आणि सच्चिदानंद स्वरूपाने प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेली परांबा आहे! हे ओळखण्यासाठी शारदीय नवरात्रोत्सव आहे. असा उपदेश भागवत कथाकार तथा हभप मनिषाताई बिडाईत यांनी उपस्थित भाविकांना किर्तन प्रसंगी केला. यावेळी किर्तनास महीलांची लक्षणीय उपस्थिती होती.