March 25, 2026


बजाजनगर, (ता. 25) – संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी येथील साई वैभवनगरात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते स्थानिक विकास निधीतून 40 लक्ष निधी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (ता. 24) रोजी मोठ्या उत्साहात झाले.


औद्योगिक परिसर असल्याने कामगारांची वस्ती मोठी येथे वाढली आहे. आज रोजी 40 हजार वस्तीचे हे गाव झाले असून रस्त्याच्या अनेक समस्या येथे निर्माण झाल्या असल्याने येथील विकासात माझ्याकडून अल्पभर टाकण्यात आली. असे मनोगत दानवे यांनी व्यक्त केले याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, शहरप्रमुख विशाल खंडागळे, तालुका संघटक मनोज गायके, उपतालुकाप्रमुख विष्णु जाधव, माजी पंचायत समिती सदस्य गणेश नवले, पाटोद्याचे उपसरपंच कपिंद्र पेरे, मार्केट कमिटीचे संचालक महेंद्र खोतकर, उपशहरप्रमुख काकाजी जिवरग, उद्योजक सुभाष औताडे, उपशहरप्रमुख बिबन सय्यद, उपतालुकाप्रमुख संघटक अनिल जाधव, विभाग प्रमुख सतिश हिवाळे, रोहिदास चव्हाण, संतोष चंदन, बजरंग पाटील, अशोक कटारे, त्र्यंबक जगत्ताप, महिला आघाडी तालुका संघटक अनिता पाटील व संगीता बनकर, मिराबाई चव्हाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *